abc

मनोरंजन विश्व


अप्रतीम कलाकृती लघुपट भूक... (जेव्हा लागते तेव्हा!...)




अप्रतीम कलाकृती लघुपट भूक... (जेव्हा लागते तेव्हा!...)

                सामाजीक विषयावर भाष्य करणारा परतु काळीज पिळवटुन टाकणारा असा हा लघुपट सुंदर सादरीकरण व दमदार अभीनयाच्या जोरावर अप्रतीम झाला आहे. कुठलाही विषय सादर करताना भाषा किंवा संवाद जरुरी असतातच असे नाहीआणि हेच तत्व लक्षात घेऊन सादर केलेला हा लघुपट फार सुंदर परंतु प्रसंग काळजाला साद घालतो रवी ओव्हाळे यांच प्रसंगाला साजेस संगीत आणि त्यात आकाश शिंगाडे या ऊदयोन्मुख कलाकारातचा एखाद्या प्रदिर्घ कारकीर्द असलेल्या कलाकाराला लाजवेल असा दमदार अभीनय. आकाश येत्या काळात एखादया बिगबजेट सिनेमात लीड रोल करताना दिसेल यात वादच नाही आणि त्याच तोडिस तोड असे रवि ओव्हाळे यांच अप्रतीम दिग्दर्शन रमेश काटकरची कथा भन्नाट आहे. तसीच ती प्रत्येताला क्षणभर विचार करायला लावणारी आहे. रमेशचे छायाचित्रण लाजवाबच आहे, सागर कुंद्रुप व रविचे एडीटींग सुपर झाले आहे. तर असा हा सामाजीक संदेश देणारा लघुपट सर्वार्थाने एक अप्रतीम कलीकृतीच म्हणावी लागेल.
शेवटी भूक.... च्या टिमला आकाश व रवि ला त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी खुप खपु शुभेच्छा देत आपल्या सर्व वाचकांना आवाहन करतो एक वेळ जरुर पहा जल्लोश ईंटरीटेंटमेंटची अप्रतीम कलाकृती लघुपट - भूक... (जेव्हा लागते तेव्हा!...)

भूक... (जेव्हा लागते तेव्हा!...) on YouTube


पुन्हा भेटु नविन विषय व नविन कलाकृती सह.
धन्यवाद!...

No comments:

Post a Comment