‘संघर्षयात्रा’
लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जीवनप्रवास अखेर १४ एप्रिलला येणार प्रेक्षकांच्या भेटीला....
आपल्या देशात राजकीय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्तींवर चित्रपट करण्याची एक परंपराच आहे. अशाच चरित्रपटांमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत असणारा चित्रपट म्हणजे ‘संघर्षयात्रा’. भारतीय जनता पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपद भूषविलेले लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जीवनप्रवास ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत येण्यासाठी सज्ज झाला आहे. बराच काळ ताटकळत राहिलेला हा चित्रपट सरतेशेवटी १४ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या भूमिकेत अभिनेता शरद केळकर दिसणार असून, मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांची भूमिका श्रुती मराठेने साकारली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू, तसेच त्यांचे नाटय़पूर्ण राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य मोठयापडदयावर पहायला मिळणार असल्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
युवा दिग्दर्शक साकार राऊतने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व भाजप चित्रपट युनियनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विराज मुळे, विशाल घार्गे यांनी लिहिले आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांनीही चित्रपटातील एका गाण्यासाठी पार्श्वगायन केले आहे. तुर्तास चित्रपट प्रदर्शीत होण्याचे सगळे मार्ग माकळे झाले आहेत येत्या व १४ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होत आहे.
अतीशय संवेदनशील अशा कथेला प्रेक्षकांची दाद नक्कीच मिळेल यात शंकाच नाही’.
त्या नीमीत्ताने चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मिडीयावर विशेष पसंती मीऴत आहे.
धन्यनाद!...
SANGHARSH YATRA Movie OFFICIAL Promo
फोटो च्या माध्यमातुन लोकनेता स्व. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
all photo: google.com
Video: youtube.com
No comments:
Post a Comment