“तमाशा”
टांग टिंग टिंग टिंग टांग टांग टांग टांग .......
ढोलकीची थाप, घुंगरांचा छनछनाट आणि टाळ्या-शिट्ट्यांचा कडकडाटात मंजुळ आवाजात ‘या रावजी'............ हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो "तमाशा". एकेकाळी रसिकांच्या हृदयात आदराचे स्थान असलेल्या तमाशा कलेला आज मात्र उतरती कळा लागलीय. सध्या महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू असून, गावागावात करमणुकीला तमाशा हा आलाच. पण सध्या हा अस्सल गावरान नजराणा पाहायला मिळतोय तो फक्त आणि फक्त गावच्या जत्रेतच...आणि हा तमाशा ठरवायचा असेल तर तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगावला जावंच लागणार. इथे २०/२५ फडमालकांनी आपली राहुटीवजा बुकिंग कार्यालयं उभारलेली आहेत आणि गावोगावचे यात्राकमेटीवाले, मंडऴांचे अध्यक्ष सचिव पुढारीमंडळी, सुपारी ठरवण्यासाठी गर्दी करताना दिसतात. महागाईचा मोठा सामना या फडमालकांना सतावतोय. परंतु सावकाराकडून कर्ज घेत का होईना पण या सर्व संकटांवर मात करीत तमाशा फडाचे मालक विविध गावांच्या यात्रांमध्ये करमणुकीसाठी कलेच्या माध्यमातून आपलाही सहभाग नोंदवत खारीचा वाटा उचलताहेत, हे विशेष.
गावबाहेरच्या मोकळ्या माळरानात फडांतील ही मंडळी वेळ मिळेल तसा सराव करतात. उघड्या माळरानावरचा आपल्या मुला-बाळांसोबत हा फिरता संसार सावरत भटकंती सुरू आसते. या कलावंतांचा प्रवासही ऐपतीप्रमाणे धोकादायक ट्रकमधून जुनाट मीनाबस वगैरे मधुनचालतो याच माळरानांवर भुकेची भ्रांत मिटवणे आणि साजशृंगारही अर्थात तिथेच चालतात. तुम्हा आम्हा प्रमाणेच या फडातल्या मंडळींना सुदधा या वर्षी नोटबंदी आणि आता महागाईचा चांगलाच फटका बसल्याचे जाणवते.
all photo: google
तसा आजचा तमाशा सुदधा पहिल्या तमाशा सारखा रहीला नाही थोडक्यात त्याला आरक्रेस्टा चे रुप आले आहे. तो जुना बाज पहायला मिळने कठिण झाले आहे, क्वचितच पहायला मिऴतो पण तसे पहाता काळानुरुप बदल करणे सुदधा तेवढेच गरजेचे झाले आहे, परंतु या परिवर्तनातुन आजचा तमाशा हाच खरा “तमाशा” (धांगड धिंगा ) होऊ नये हिच चिंता सतावत आहे. कारण महाराष्ट्रच्या लोक कलेत तमाशाला मानाचे स्थान आहे. किंबहुना तमाशा हे महाराष्ट्रच्या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. तसेच या कले साठी हजारो जणांनी आपले अख्खे आयुष्य खपवले आहे खपवत आहेत. एखादयाचा नामोल्लेख करणे लहान तोंडी मोठा घास होईल पण पटठे बापुरावां पासुन काल परवा पर्यंत कै. काळुबाळु, लावणिसम्राग्नी सुरेखा पुणेकर ते आजचा तमाशाचा चेहरा म्हणजे मंगला बनसोडे नीतीन बनसोडे रघुविर खेडकर आणि असे हजारो कलावंत अगदी जिवाचे रान करीत आहेत हि कला जिवंत ठेवण्या साठी पण आशा या कलेसाठी आज मात्र सरकार दरबारी सुदधा केवळ एक चघऴायचा मुददा म्हणुन कींमत शील्लक राहीली आहे. कालांतराने जसा टेलीग्राम बंद झाला रेडिओ ची जागा टिव्ही ने घेतली आणि सध्या तर स्मार्टफोनने लेंडलाईन फोन, रेडीओ, टेपरेकार्डर, घडयाळ, केलक्युलेटर अशा कितीतरी साधनांना कालबाह्य ठरवले. अशा या व्हाटसप, फेसबुक आणि मल्टीप्लेक्स, 3डी, 5डी, 100,200,300 कोटीच्या कोटी ऊड्डाण मारणा-या सुसाट सैराट व झींगाट सुटलेल्या सिनेमांच्या दुनीयादारीत ही लोक कला तग घरुन रहाते की प्रवाहा बरोबर वाहुन जाते याचीच प्रत्येक मराठी मनाला हुरहुर लागुन राहीली आहे.
"कै. काऴुबाऴु यांना भावपुर्ण आदरांजली"
वर नमुद केल्या प्रमाणे काळ बदलला, महागाई वाढली अन तमाशा ही कलाच लोप पावू लागली. परंतु काहीही झाले तरी वीतभर पोटासाठी आणि संसाराचा गाडा हाकण्यासाठी हालचाल तर करायलाच हवी; मग ती हालचाल कलेच्या माध्यमातून का असेना. त्यात जमेची बीजु अशी की दुष्काळ जरी असला, तरी गावोगावी यात्रा जत्रा तर होणारच, त्यात बैलगाडा शर्यतबंदी असल्याने त्याशर्यतींवर होणारा खर्च तमाशावर होणार असे दिसते परंतु तरीही गावकरी मात्र कमी बजेटच्या तमाशांना प्राधान्य देत आहेत. हा तमाशाचा ट्रेंडच सध्यातरी गावा-गावात दिसत आहे. पण हाच यात्रांचा कालावधी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार बनुन का होईना पण या तमाशा कलावंतांनाच नव्हे तर त्यांच्यातल्या कलाकाराला जगवतोय त्यांचे पोट भरतोय हे ही तेवढेच खरे. या कलेला पुर्वीसारखे वैभव, झळाळी, मान मरतब, प्रतीष्ठा प्राप्त व्हावी आणि लोप होत चाललेली ढोलकीची थाप पुढच्या पिढ्यांना एकायला मीऴावी पुन्हा एकदा तमाम रसिकांच्या हृदयात आदराचे स्थान मिळावे हिच महाराष्ट्रातील तमाम ग्रामदैवतांना प्रर्थना, कारण त्यांच्याच मुऴे आज तमाशा जिवंत आहे आणि राहील.
धन्यवाद!...
जयहिंद!...
जय महाराष्ट्र!....
वाचकांसाठी वाजलेकी बारा ची एक video झलक सौजन्य: You Tube https://youtu.be/7R7QJkznJGU
video सौजन्य: You Tube
all photo सौजन्य : google
सौजन्य : google
all photo सौजन्य : google
सौजन्य : google
ग्रामदैवतां मुऴे आज तमाशा जिवंत आहे
ReplyDeleteत्यात बैलगाडा शर्यतबंदी असल्याने त्याशर्यतींवर होणारा खर्च तमाशावर होणार
ReplyDelete