abc

Tuesday, June 27, 2017

HOME REMEDIES ON ACIDITY...(in Marathi)


पित्तावर काही घरगुती उपचार नक्की आजमावून पाहा

 

मित्रहो, अपुर्ण अर्धवट झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलटया होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ऍन्टासिड्‌स (आम्लता नष्ट करणारा अल्कलाईन पदार्थ) ही निष्फळ ठरतात, तेव्हा मी आपल्या साठी घेऊन आलो आहे

पित्तावर 

काही घरगुती उपचार, नक्की आजमावून पाहा.

पुदिना

पुदिन्याचे पानं – पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्यावं. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास, डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास पुदिन्यातील मेन्थॉल नावाचा पदार्थ मदत करतो.

तुळस



तुळशीची पाने – तुळशीमधील ऍन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणा-या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर – तुळशीची पाने चावून खावीत आराम मिळतो.

बडीशेप



बडीशेप – बडीशेपमधील ऍन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास, बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

जिरे

जिरे – जि-याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते, ज्यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जि-याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो किंवा तुम्ही जि-याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.

लवंग



लवंग – लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते, पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते. लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा, त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घशातील खवखवही कमी होते.

वेलची


वेलची – आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.

अद्रक


अद्रक – अद्रक या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो. आल्याच्या सेवनाने पचन सुधारते. तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो. आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा. तुम्हाला आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावं किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गूळ टाकून चोखत राहा.

आवळा


आवळा – तुरट, आंबट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटामिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.

केळी


केळी – केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो. त्यामुळे पोटात आम्ल (acid) निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळे खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो.

दूध

दूध – दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्लनिर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. दूध हे पित्तशामक असून ते थंड तसंच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे. मात्र त्यात चमचाभर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.

तर हे होते

पित्तावर 

काही घरगुती उपचार, नक्कीच आजमावून पाहा.

टिपण्णी: ऊपरोक्त माहीती ऊपलब्ध स्त्रोतांपासुन संकलन करुन सादर केली आहे.
धन्यवाद!..
जय हिंद!!...
भारत माता कि जय!!...

2 comments:

  1. Apart from home remedies you can also use natural supplement for acidity in terms of effectiveness.

    ReplyDelete
  2. Natural home remedies for acidity is the best post for us. Most of the people are not controlling there diet then it give result is acidity problem, for those people Tonic For Acidity are useful.

    ReplyDelete